भरसभेत काँग्रेस नेते हार्दिक पटेलांना लगावली थप्पड

Foto

अहमदाबाद: गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील वाढवान येथील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेत पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल हे भाषण करता असताना एका अज्ञान व्यक्‍तीने पटेल यांंच्या श्रीमुखात लगावल्याची घटना घडली. यामुळे सभेत एकच गोंधळ उडाला. हार्दिकला थप्पड लगावणार्‍या व्यक्‍तीला उपस्थित कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला. पोलिसांची हस्तक्षेप करत सदर व्यक्‍तीची कार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटका करून त्याला ताब्यात घेतले आहे.
  कालच नवी दिल्‍लीतील भाजप कार्यालयात भाजप प्रवक्‍तेजी. व्ही.एल. नरसिंह राव यांच्यावर पत्रकार परिषदेत बूट फेकून मारल्याची घटना ताजी असतानाच, आज हार्दिक पटेल यांना प्रचारसभेत थप्पड लगावल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हार्दिक पटेलला थप्पड लगावल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. हार्दिक पटेल यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, ते गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत. आज सुरेंद्रनगरमधील वाढवान येथे हार्दिक पटेल हे प्रचारसभेत भाषण करत असताना, अचानक व्यासपीठावर चढून एका अज्ञान व्यक्‍तीने पटेल यांच्या कानशिलात लगावली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे व्यासपीठावर काही वेळ गोंधळ उडाला. तिथे उपस्थित कार्यकर्त्यांनी त्या व्यक्‍तीला बेदम मारहाण केली. त्या व्यक्‍तीच्या अंगावरचे कपडेही फाडले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याची सुटका केली आणि रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर संबंधित व्यक्‍तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अद्याप त्या व्यक्‍तीची ओळख जाहीर करण्यात आली नाही. मात्र, सदर व्यक्‍ती भाजपशी संबंधित असल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनी केला आहे. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker